Thursday, May 2, 2024
Homeधुळेभोग्यांच्या राजकारणात काँग्रेसचा जुमला : म्हणे आता जनताच शिकवीन चांगलाच धडा

भोग्यांच्या राजकारणात काँग्रेसचा जुमला : म्हणे आता जनताच शिकवीन चांगलाच धडा

धुळे Dhule। प्रतिनिधी

जनतेच्या खर्‍या प्रश्नांपासून (questions) जनतेची दिशाभूल (Misleading the public) करण्यासाठी देशात जातीयतेचे आणि भोंग्याचे राजकारण (Bhoṅgyace rajakaraṇa) सुरु आहे. भोंग्याचे राजकारण करायचे असेल तर लोकांच्या प्रश्नांसाठी करा, आज पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) आणि गॅसचे भाव (rate) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनता महागाईने होरपळली जात आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रचंड हाल या केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) सरकारने केले आहेत. म्हणून तत्काळ पेट्रोल डिझेल, गॅसचे भाव कमी करा अन्यथा या देशातील जनता (public) केंद्रातील सरकार उलथविल्याशिवाय (overthrowing the government) राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील (Pradesh Congress Working President MLA Kunal Patil) यांनी काँग्रेसच्या भोंगा आंदोलनात दिला.

- Advertisement -

दरम्यान हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि हिंदूत्व आमच्या मनात, हृदयात आहे याचे आम्ही कधीही रस्त्यावर उतरुन राजकारण (Politics) केले नसल्याचेही आ.पाटील यांनी विरोधकांना सुनावले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले (Congress State President MLA. Nana Patole) यांच्या सूचनेवरुन काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.25 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ वाढत्या महागाई विरोधात भोंगा (Inflation Against Horn Playing) वाजवून महागाई जुमला आंदोलन (Inflation Jumla Movement) करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या आवाजात महागाईच्या ध्वनीफीत वाजविण्यात आल्या.

प्रारंभी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, धुळे शहराध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे यांची भाषणे झालीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाज दिला की जर भोंग्यावरती काही सांगायचे असेल तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न (question) भोंग्यावरुन मांडा, आज राज्यात आणि देशात हिंदूत्वाचा आणि हनुमान चालीसाचा प्रश्न विरोधी पक्ष (Opposition) पुढे करतात, अरे पण हिंदुत्व आणि हनुमान चालीसा आमच्या मनात, हृदयात आहे.त्याच कधी आम्ही रस्त्यावर उतरुन राजकारण केले नाही. रस्त्यावर उतरायचे असेल तर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य कसे होईल यासाठी लढले पाहिजे. म्हणून आज काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य प्रश्न मांडण्यासाठी भोंग्यावरचे आंदोलन करीत आहोत.

वाढती महागाई, (Rising inflation) पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढणार्‍या किमतींवर केंद्रातील मोदी सरकार बोलत नाही त्यांना बोलतं करण्यासाठी या पुढे कडक आंदोलन करण्यात येईल. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने आज खते, बी-बियाणे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आणि याचा सर्व भार शेतकरी (Farmers), सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे. म्हणून येत्या काही दिवसात गगनाला भिडलेली महागाई कमी केली नाही तर जनता भाजपाचे केंद्रातील सरकार उलथविल्याशिवाय (overthrowing the government) राहणार नाही असा इशारा आ.पाटील यांनी यावेळी दिला.

मोदींच्या आवाजाची ध्वनीफीत

आंदोलनस्थळी काँग्रेस पादाधिकार्‍यांनी लोटगाडीवर भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची ध्वनीफीत वाजवली. पेट्रोल के दाम कम हूए की नई हूए, डिझेल के दाम कम हूए कि नही हूए, महंगाई कम हूई कि नही हूई, पंतप्रधान मोदी यांच्या प्रश्नोत्तर स्वरुपातील भाषणातील अंश भोंग्यावर वाजविण्यात आला. त्यामुळे जनतेचे लक्ष वेधले गेले.

यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष माजी आ.प्रा. शरद पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर शेठ, तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार, रावसाहेब पाटील, हसण पठाण, माजी सरपंच भटू चौधरी, अरुण पाटील, डॉ.चंद्रकांत राजपूत, एन.डी. पाटील, माजी सरपंच सोमनाथ पाटील, उपसरपंच हिरामण पाटील, मुकूंद कोळवले, पप्पू सहानी, नरोत्तम मुलचंदानी, सेवा दलाचे राजेंद्र खैरनार, उत्तमराव देसले, भानुदास गांगुर्डे, राजेंद्र देवरे, याकूब पठाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, राजीव पाटील,माजी जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज चव्हाण, भिवसन अहिरे, धर्मराज बागुल, शिवा चौधरी, प्रविण पवार, युसूफ सैय्यद, अफसर सैय्यद यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या