Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या...कोणी रेमडेसिवीर देता का?

…कोणी रेमडेसिवीर देता का?

नाशिक। प्रतिनिधी

गेल्या आठ ते द हा दिवसांपासून शहर तसेच जिल्हाभरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू आहे. डॉक्टर्स, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पक्ष- संघटनांचे पदाधिकारी अशा सर्वांनाच रूग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी विनंतीचे दिवसभर दुरध्वनी येत आहेत. तर ज्या काही मोजक्या मेडिकल दुकानांमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहेत त्या ठिकाणी दिवस दिवसभर रांगा लागल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

नाशिकप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यांतही हेच चित्र असल्याने सगळीकडेच तुटवडा आहे. 48 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याला लोकसंख्येच्या तुलनेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा कमी मिळत आहेे. संपुर्ण जिल्ह्यासाठी एक दिवसाला कंपनीकडून साडेचार हजार रेमडेसिव्हिरची इंजेक्शनं मिळतात. परिणामी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा किंमत मोजायची तयारी ठेवूनही इंजेक्शन मिळत नाही. मेडिकल दुकानात 1 हजार 200 रुपयांत मिळणारे हे इंजेक्शन घेण्यासाठी पहाटे पाचपासून करोनाबाधितांचे नातेवाईक रांगा लावताना दिसत आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांचा आटापिटा कायमच आहे. तब्बल आठवड्यापासून शेकडो करोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक नाशिकला विविध मेडिकल दुकानांसमोर सकाळ-सायंकाळ गर्दी करत आहे. आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्याबाहेरील लोकांना इंजेक्शन मिळाले, मात्र आता ही गर्दी वाढतच आहे. नाशकात दर कमी असल्याने उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून लोक इंजेक्शनसाठी नाशिकला गर्दी करू लागले आहेत.

दुकानात जे इंजेक्शन बाराशे रुपयांना मिळते, तेच इंजेक्शन रुग्णालयात अव्वाच्या सव्वा भावाने मिळत असल्याने वाजवी दरात इंजेक्शन मिळविण्यासाठी अनेक जण रांगा लावत आहेत. किमान चार हजार रुपयांपासून गरजेनुसार अगदी 12 हजारांपर्यंत काळ्या बाजारात त्याची विक्री होते. एकाच कंपनीचे इंजेक्शन रुग्णालयाकडून चार हजाराला घ्यावे लागत आहे.

प्रोटोकॉलची तयारी

प्रशासन रेमडेसिवीर इंजेक्शन वापराबाबत प्रोटोकॉल तयार करण्याच्या विचाराधीन आहे. जिल्हा यंत्रणेने रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णालयाची विहित नमुन्यातील मागणी, अर्जातील थेट शिफारस ग्राह्य धरावी. अस त्यानंतर इंजेक्शनचे थेट रुग्णालयातील ज्याच्या नावाने दिले गेले, त्याच रुग्णाच्या बेडवर ते पोचावे. त्यानंतर वापरलेल्या इंजेक्शनची बाटली जपून ठेवायची. त्याचे दर निश्चित ठेवायचे, असा निर्णय प्रशासनाच्या विचाराधिन आहे. त्यासाठी राज्य शासनाला जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल पाठविला आहे.

शासकीय रूग्णालयात पुरेसा साठा

जिल्हा रूग्णालयासह जिल्हाभरातील शासकीय रूग्णालयांमध्ये दाखल झालेल्या करोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सध्या अडीच हजार इंजेक्शन उपलब्ध असून अधिक 3 हजार इंजेक्शन दोन दिवसात उपलब्ध होणार आहेत. शासकीय रूग्णालयातच दाखल असणार्‍या रूग्णाला आवश्यकता भासल्यास सबंधीत रूग्णालयाकडून ऑनलाईन औषध वितरण प्रणालीवर मागणी केली जाते व त्याद्वारेच ते उपलब्ध करून दिले जाते.

डॉ. निखिल सैंदाणे, घटना व्यवस्थापक, करोना

- Advertisment -

ताज्या बातम्या