Monday, May 6, 2024
Homeनगरश्रीरामपूरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचे लचके तोडले

श्रीरामपूरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचे लचके तोडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील (Shrirampur City) विविध भागांमध्ये बाहेरुन आलेल्या मोकाट कुत्र्यांनी (Dog) हैदोस घातला असून या मोकाट कुत्र्यांनी (Dog Attack) केलेल्या हल्ल्यात सरस्वती कॉलनीतील एका पाच वर्षीय चिमुरड्याच्या डोळयाचे (Eye) लचके तोडले. या त्यास गंभीर दुखापत (Injured) झाली असून त्याचेवर पुणे (Pune) येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून या मोकाट कुत्र्यांचा (Dog) तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली असता त्याकडे मुख्यधिकार्‍यांनी दुर्लक्ष (CEO Ignore) केले तसेच अन्य अधिकार्‍यांनाही याबाबत काही सूचना केल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील सरस्वती कॉलनीमध्ये एका 5 वर्षोचा चंदन बनसोडे यांच्या लहान मुलाचे 10/12 कुत्र्यांनी (Dog) अक्षरशा लचके तोडले. यात या चिमुरड्याच्या डोळ्याच्या भागात गंभीर जखम झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यास पुणे (Pune) येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात असून त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तेथे उपचार सुरु आहेत. बनसोडे हे एक गरीब कुटुंब असून या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे (Dog Attack) यात त्यांना मोठे आर्थिक झळ बसली आहे.

अशी मोकाट कुत्रे अनेक दिवसापासून बाहेर गावहून या ठिकाणी आणून सोडले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सुटला असून ही कुत्रे रस्त्यांवरुन येणार्‍या जाणार्‍यांना चावा घेवून जखमी करत आहेत. या मोकाट कुत्र्यांना पालिकेने आवर घालावा अशा नेक तक्रारी नागरिकांनी दिल्या आहेत.

सरस्वती कॉलनीतील ही घटना घडल्यानंतर माजी नगरसेवक आशिष धनवटे यांनी मुख्याधिकारी यांना या घटनेची माहिती देवून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली. तीन दिवस होवूनही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात मुख्याधिकार्‍यांनाच नाही तर कोणत्याही अधिकार्‍यांना वेळ मिळत नसल्याचे दिसून आले. याबाबत तकयारी करुनही काहीही कार्यवाही होत नसल्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांच्या अशा वागणुकीचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

साधी चौकशीही केली नाही, शेवटी एखाद्याचा जीव जर गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे जर या मोकाट कुत्र्यांवर कारवाई झाली नाही तर मी व माजी नगरसेवक अशिष धनवटे गावातील कुत्रे गोळा करून नगरपालिकेत आणून सोडल्याशिवाय राहणार नाही याची दखल मुख्याधिकार्‍यांनी घ्यावी, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे व अशिष धनवटे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या