नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानच्या भारताविरोधी कुरघोड्या करण्याचे काही केल्या कमी होत नाही. अणूचाचण्या न करण्यासाठी दबाव आणणाऱ्या अमेरिकेकडून सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत मोठा खुलासा केला आहे. “पाकिस्तानचा त्या देशांमध्ये समावेश होतो, जे सक्रीयपणे अणवस्त्रांची टेस्टिंग करत आहेत. रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान सारख्या देशांच्या घडामोडी पाहता अमेरिकेने सुद्धा पुन्हा अणवस्त्र परीक्षण सुरु केलं पाहिजे” असे ट्रम्प बोलता, बोलता बोलून गेले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका खासगी वृत्तसंस्थेशी मुलाखतीदरम्यान सांगितले, रशिया आणि चीनप्रमाणेच पाकिस्तानही अणुबॉम्बची चाचणी करत असल्याचे त्यांनी खुलासा केला. ट्रम्प यांनी एका मुलाखतीत हे दावा केला. उत्तर कोरियाही सातत्याने अणुचाचण्या करत असल्याचा दावा केला. इतर देश चाचण्या करत असल्याने, आता अमेरिकाही पुन्हा न्युक्लिअर टेस्ट करणार असल्याचे स्पष्ट केले. जगातील अनेक देश गुप्तरित्या न्युक्लिअर टेस्ट चाचणी करत आहेत, पण ते याबद्दल बोलत नाहीत असा ट्रम्प यांनी दावा केला.
अमेरिकेकडे सर्वाधिक अण्वस्त्र
“रशियाने घोषणा केलीय की ते परीक्षण करणार. उत्तर कोरिया सतत टेस्ट करतोय. अन्य देशही मागे नाहीत. फक्त आपणच टेस्ट करत नाहीय. आपण अणवस्त्रांची चाचणी न करणारा देश बनून राहू नये” असे ट्रम्प म्हणाले. “अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक अणवस्त्र आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. आमच्याकडे इतकी अणवस्त्र आहेत की, आम्ही जगाला 150 वेळा नष्ट करु शकतो. रशियाचे व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत अणवस्त्रांच्या निशस्त्रीकरणाबद्दल चर्चा केली आहे” असे ते म्हणाले. अमेरिकेने अणवस्त्रांच्या टेस्टिंगची पूर्ण तयारी केली आहे. त्यांनी वेळ आणि स्थान सांगितले नाही.
पाकिस्तानला अण्वस्त्रांची खुमखुमी
जगात पुन्हा एकदा अणवस्त्रांची स्पर्धा वाढू लागली आहे. भारताकडे सुद्धा अणवस्त्र आहेत. पण भारताची भूमिका ही शांततेची आहे. त्यामुळे भारत या मुद्यावर सहसा मतप्रदर्शन करत नाही. पण शेजारच्या पाकिस्तानला अणवस्त्राची खूप खुमखुमी आहे. ते चाचण्या सुद्धा करतायत. हे ट्रम्प यांच्या खुलाशामुळे स्पष्ट झालय.
भारत-पाक सीमेवर वाढणार तणाव?
या गुप्त चाचण्यांवर जोर देत ट्रम्प यांनी थेट पाकिस्तान आणि उत्तर कोरियाचे नाव घेतले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या न्युक्लिअर टेस्टवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः भारतासाठी ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सतत भारतावर कुरघोडी सुरू आहेत. त्यात जर न्युक्लिअर टेस्ट यशस्वीरित्या पार पडली तर भारताची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




