Friday, May 3, 2024
Homeधुळेभरधाव ट्रक उलटून सात गुरे ठार

भरधाव ट्रक उलटून सात गुरे ठार

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शेवाडे-लामकानी रस्त्यारील शेवाड गावानजीक भरधाव ट्रक नाल्यात पलटी होऊन अपघात झाला. त्यामुळे अवैधरित्या गुरे वाहतूक होत असल्याचे उघड झाले.

- Advertisement -

अपघात 7 गुराचा दबून मृत्यू झाला. तर बजावलेल्या आठ गुरांना तामथरे गोशाळेत रवाना केले आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अवैध मार्गाने गुरे वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच 41 जी 6918) शेवाडे-लामकानी रस्त्याने जात असतांना शेवाडे गावाजवळ महाजन बियर शॉपी समोरच्या नाल्यात पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पलटी झाला.

अपघातानंतर ग्रामस्थ धावून आले. तर माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते.

ट्रकमध्ये 15 गुरांना निदर्यपणे कोंबून त्यांची वाहतूक होत होती. अपघातात ट्रकच्या खाली दाबल्याने 7 गुरांचा मृत्यू झाला.

मयत गुरांचा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. तर बचावलेल्या आठ गुरांना तामथरे गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी ट्रक जप्त केला असून त्याला शिंदखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या