Friday, May 3, 2024
Homeधुळेदोंडाईचा शहराला छावणीचे स्वरुप

दोंडाईचा शहराला छावणीचे स्वरुप

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

पोलीस ठाण्यावर दगडफेक त्यानंतर गोळीबार आणि जमावाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्यानंतर शहरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -

प्रशासनाने वाढीव बंदोबस्त लावल्याने शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप एकाही संशयीत आरोपीला अटक झालेली नाही.

अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरुन पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर एका जमावाने बुधवारी रात्री पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केली.

पोलिसांच्या ताब्यातील संशयीतांना जबरदस्ती पळवून नेले. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी दोन राऊंड फायर केले. यात एकजण जखमी झाला तर उपजिल्हा रुग्णालयाजवळ एकाचा मृतदेह आढळून आल्याने तणावात आणखी भर पडली.

या घटनेमुळे वातावरण ढवळून निघाले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्ष प्रताप दिघावकर, अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अधिकार्‍यांनी दोंडाईचात ठाण मांडले. आज शुक्रवार नमाज पठणासाठी महत्वाचा दिवस असल्याने शहरात वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला.

धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातूनही दहा अधिकारी 110 कर्मचार्‍यांसह राज्यराखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. साधारणतः 250 अधिक अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात असल्याने शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

बच्छाव यांचा मुक्काम

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे आजही दिवसभर दोंडाईचात ठाण मांडून होते. सोबत स्थानिक गुन्हा शाखेचे निरिक्षक शिवाजी बुधवंत आणि इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुनिल भाबड यांच्याकडे तात्पुरता दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

दोंडाईचात एकाच दिवशी घडलेल्या वेगवेगळ्या तीन घटनांमुळे तीन स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यातील संशयितांचा शोध घेवून चौकशी सुरु असून लवकरच संशयीत आरोपी ताब्यात असतील असे श्री.बच्छाव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या