Sunday, May 19, 2024
Homeधुळेअंत्यविधीबाबत अप्पर तहसीलदारांनी काढले नवीन आदेश

अंत्यविधीबाबत अप्पर तहसीलदारांनी काढले नवीन आदेश

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आता मृत्युदरही वाढला आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयाकडून सध्या दररोज साते ते आठ मृतदेह प्राप्त होत असून त्यांच्यावर शहरात अमरधामध्येच अत्यसंस्कार केले जात आहेत.

- Advertisement -

प्रसंगी गर्दी वाढत असल्यामुळे भितीपोटी अमरधाम परिसरातील नागरिक शहराबाहेरील मयत रूग्णांना अंत्यसंस्कारास विरोध दर्शवित आहे.

त्यात अमरधामची क्षमता, नपाची व्यवस्था अपूरी पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने अंत्यविधीबाबत नवीन नियमावली आखली आहे. याबाबतचे आदेश अप्पर तहसीलदार सुदाम महाजन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिले आहे.

दोंडाईचा नगरपरिषदेच्या हद्दीत करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे रूग्ण संख्या तर वाढतच आहेत.

मात्र आता मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयात दिवसभरात सात ते आठ जणांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे.

करोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टनसिंग पालन करणे, माक्स वापरण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सर्व अंत्यविधी कार्यक्रमाच्या ठिकाणी 20 पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही, याची दक्षता घ्यावी.

नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर थेट गुन्हा नोंद कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या