Wednesday, April 29, 2026
Homeक्राईमCrime News : हुंड्यासाठी छळ, पतीने केले दुसरे लग्न; पाच जणांवर गुन्हा...

Crime News : हुंड्यासाठी छळ, पतीने केले दुसरे लग्न; पाच जणांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

हुंड्यात पैसे कमी आणले म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तिला मारहाण करणे आणि पतीने दुसरे लग्न करून नांदवण्यास नकार दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिक येथे घडली असून पीडित महिलेने अहिल्यानगरमध्ये फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पती नारायण हनुमंत गायकवाड, दीर मल्लेश गायकवाड, सुरेश हनुमंत गायकवाड, नणंद शांताबाई जाधव आणि सुशीला बंगमवार (सर्व रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे 2013 साली नारायण गायकवाड यांच्याशी लग्न झाले होते. लग्नाच्या एका वर्षानंतर, 2014 पासून किरकोळ कारणांवरून पतीने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीचे नाजूक संबंध असल्याचा जाब विचारला असता, मारहाणीचे प्रमाण आणखी वाढले. या त्रासात दीर आणि नणंदांनी देखील भर घातली.

तुझ्या लग्नात हुंडा कमी दिला, असे टोमणे मारून ते पतीला मारहाण करण्यासाठी चिथावणी देत असत, असा आरोप फिर्यादीने केला आहे. मे 2021 मध्ये पती नारायण गायकवाड याने दुसरे लग्न केले. हा प्रकार असह्य झाल्याने फिर्यादीने नाशिक येथील पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी दिल्या. अखेर 30 एप्रिल 2023 रोजी वडील समजुतीसाठी आले असता, पतीने तुमच्या मुलीची गरज नाही, तिला घेऊन जा, असे सांगून घराबाहेर काढले. तेव्हापासून त्या आपल्या मुलीसह माहेरी, अहिल्यानगर येथे राहत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा; विवेक कोल्हेंचा समावेश

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai येत्या 12 मार्च रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने...