Saturday, May 4, 2024
Homeनगरउन्नती महिला ग्राम संघाचे कार्य कौतुकास्पद - डॉ. जयश्रीताई थोरात

उन्नती महिला ग्राम संघाचे कार्य कौतुकास्पद – डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षमता करण्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम उन्नती महिला ग्राम संघाने केले असून त्यांचे महिला सबलीकरणाचे काम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

- Advertisement -

हिवरगाव पठार येथे पंचायत समिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उन्नती महिला ग्राम संघ या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पा. खेमनर, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. मिराताई शेटे, सरपंच कुमारी सुप्रिया मिसाळ, गटविकास अधिकारी अनिल नागणे, बचत गटाचे व्यवस्थापक रवींद्र खलाटे, समन्वयक महेश पारधी, सेंट्रल बँकेचे मॅनेजर श्रीमती नवले आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात महिला बचत गटांचे मोठे जाळे आहे. पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्ती अभियान उमेद गटा अंतर्गत महिलांचे विविध बचत गट कार्यरत असून या अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेनेही या महिलांना मोठी मदत केली आहे. गोरगरीब महिलांना सेंट्रल बँकेच्या वतीने 19 लाख रुपये भांडवल म्हणून वाटप करण्यात आले आहे. यामध्ये साकुर पठारातील 25 गटांची नोंदणी आहे. महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाबरोबर या भागामध्ये समृद्धी निर्माण होणार आहे. महिलांना नव्याने ऑनलाईन चे प्रशिक्षण देण्याचे कामही या बचत गटांच्या माध्यमातून होत असल्याचे त्या म्हणाल्या.

शंकर पा. खेमनर म्हणाले, पठार भागामध्ये विविध महिलांचे बचत गट कार्यरत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून काम होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी बचत गटाला केलेल्या मदतीमुळे खर्‍या अर्थाने बचत गट स्वयंपूर्ण होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ग्रामसेवक विजय आहेर, संतोष डोळझाके, सोपान डोळझाके, वनिता मिसाळ, बबलू खेमनर, कुंदा गिरे, सुवर्णा डोळझाके, दत्तात्रय वनवे, शिवानी मिसाळ, उज्वला नागरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या