Thursday, September 19, 2024
Homeनगरडॉ. मनोरमा खेडकर यांची कागदपत्रे दिल्ली पोलिसांनी पाथर्डीतून घेतली ताब्यात

डॉ. मनोरमा खेडकर यांची कागदपत्रे दिल्ली पोलिसांनी पाथर्डीतून घेतली ताब्यात

भालगाव निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पात्रासोबतची माहिती घेतली जाणून

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संदर्भातील कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी पाथर्डी तहसील कार्यालयात दिल्ली पोलिसांचे दोन जणांचे पथक आले होते. या पथकाने स्थानिक प्रशासनाकडून पूजा खेडकर यांच्या आई व भालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवताना दाखल नामनिर्देशन पत्र तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतून ताब्यात घेतले.

दरम्यान, दिल्ली पोलीसांचे पथक खेडकर कुटूबांच्या गाव असणार्या भालगाव येथे सुद्धा जाईल असे वाटत होते. मात्र भालगावला न जात या पथकाने तहसील कार्यालयातच डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, त्याची माहिती घेतली. डॉ. खेडकर या भालगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी उभ्या राहिल्या व बहुमताने निवडून सुद्धा आल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या निवडणुकीत डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते व त्याच्या सोबत जी कागदपत्रे निवडणूक शाखेत दाखल केली होती. त्या सर्व कागदपत्रांची दिल्लीच्या पथकाने छाणनी करत या कागदपत्रांच्या प्रति आपल्या सोबत नेल्या. या संदर्भात या पथकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या