Sunday, May 19, 2024
Homeनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रति-कुलगुरुपदी डॉ. निकुंभ

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रति-कुलगुरुपदी डॉ. निकुंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) प्रति-कुलगुरुपदी डॉ. मिलिंद भानुदास निकुंभ (Milind Nikumbh) (एम.डी.आयुर्वेद) रुजू झाले आहेत. विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. निकुंभ यांची निवड केली आहे…

- Advertisement -

विद्यापीठाचे नवनियुक्त प्रति-कुलगुरु डॉ. निकुंभ यांचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही.कळसकर, डॉ. सुनिल फुगारे, डॉ. उदयसिंह रावराणे, संदीप कुलकर्णी, डॉ. स्वप्नील तोरणे, बाळू पेंढारकर उपस्थित होते.

डॉ. मिलिंद निकुंभ हे सन 2017 पासून जळगांव (Jalgaon) येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत होते. आयुर्वेद विद्याशाखेत पदवी अभ्यासक्रम शिक्षणानंतर त्यांनी सन 1999 मध्ये आयुर्वेद विद्याशाखेतील शरीर रचना विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

सन 2019 ते 2022 कालावधीत जळगांव येथील शासकीय होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता ते कार्यरत होते. सन 2012 ते 2017 कालावधीत आरोग्य विद्यापीठाच्या आयुर्वेद विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल अभ्यासमंडळाचे अध्यक्ष होते.

तसेच सन 2018 ते 2022 कालावधीत विद्यापीठाचे अभ्यासमंडळ आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासमंडळाचे सदस्य होते. राज्यात आयोजित विविध महाआरोग्य शिबिरांसाठी नोडल ऑफिसर म्हणून त्यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या