Thursday, May 2, 2024
Homeनाशिकडॉ. भारती पवार यांच्या अधिकार्‍यांना सूचना

डॉ. भारती पवार यांच्या अधिकार्‍यांना सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरोग्य विभागासह (Department of Health) कोविड-19 (covid-19), ओमायक्रोन (omicron) तसेच इतर आरोग्य विभागातील सर्व विषयांचा डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक (Health and Family Welfare Training Center, Nashik) येथे झालेल्या बैठकीत नाशिक विभागातील कोविड-19 च्या वाढत्या तिसरा लाटेतील वाढती रुग्णसंख्या व केंद्र सरकारने (central government) दिलेल्या संभाव्य रुग्ण संख्येच्या प्रमाणात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यात ऑक्सिजन बेड (Oxygen bed), आयसीयू (ICU), लहान मुलांसाठी पीआयसीयू (PICU), एचडीयु, सेंटर ऑफ एक्सलन्स (HDU, Center of Excellence), फिल्ड हॉस्पिटल यासारख्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामे व वाढत्या रुग्णसंख्येसाठी तपासणी किटस, अद्ययावत प्रयोगशाळा (Updated laboratory), रुग्णवाहिका (Ambulance), ऑक्सीजनची (Oxygen) तयारी, त्यात पीएसए प्लांट, एलएमओ प्लांट या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

या सर्व कोविड-19 उपचारासाठी केंद्र सरकारच्या (central government) माध्यमातून आजपर्यंत इसीआरपी-1 व इसीआरपी-2 अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी (fund) देण्यात आलेला आहे. इसीआरपी-1 मध्ये रु.116 कोटी 60 लाख निधी देण्यात आला होता. इसीआरपी-2 मध्ये रु.112 कोटी 38 लाख निधी देण्यात आलेला आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीत कोविड लसीकरणाचा (vaccination) देखील आढावा घेण्यात आला.

बैठकीत नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, प्राचार्य डॉ. वाघचौरे, सहसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. किरण पाटील, डॉ. बांगर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. संतोष नवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या