Tuesday, March 25, 2025
Homeनगरअन्याय होईल त्यावेळी धर्माच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे - डॉ.सुजय विखे पाटील

अन्याय होईल त्यावेळी धर्माच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे – डॉ.सुजय विखे पाटील

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहात्यात मोर्चा

राहाता |वार्ताहर| Rahata

जेव्हा जेव्हा आपल्या धर्मावर अन्याय होईल त्यावेळी धर्माच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राहाता येथे आयोजित निषेध मोर्चात डॉ. विखे उपस्थित हिंदू बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत सोमवारी राहाता शहरात सर्व हिंदुत्ववादी संघटनेने या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. सोमवारी वीरभद्र मंदिरासमोर उपस्थित असलेल्या हिंदू बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती केली. त्यानंतर वीरभद्र मंदिरापासून गळवंती मार्गाने डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारत माता की जय, जय श्रीराम घोषणा देत या मोर्चात सामील झाले होते.

- Advertisement -

पुन्हा मोर्चाद्वारे वीरभद्र मंदिरासमोर एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. यावेळी डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, जेव्हा जेव्हा धर्मावर अन्याय होईल. त्यावेळी धर्माचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज संपूर्ण भारतभर या घटनेच्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वजण वारंवार एकत्रपणे संघटित राहून या घटनेचा निषेध करू. ज्या ज्या गोष्टी आपल्या समाज, धर्माच्या विरुद्ध असतील त्याचा काटेकोरपणे विरोध विखे पाटील परिवार आपल्या सर्वांच्या सहकार्याने करीत राहील, याची मी आपणांस गवाही देतो.
यावेळी मुक्ताताई दिघे यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे सांगत आपले विचार मांडले.

तसेच नवनाथ महाराज म्हस्के यांनी बांगलादेशमध्ये हिंदू महिलांवर सातत्याने मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्याठिकाणी हिंदू धर्म नष्ट करण्याचे काम बांगलादेश करत असून हिंदू बांधवांना रक्षण देण्यासाठी सर्व हिंदू समाज बांधवांनी एकत्र होणे गरजेचे आहे. भारत देशापासून बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांची जातीयतेच्या नावाखाली फाळणी केली गेली. काश्मीरमध्ये हजारो हिंदूंची कत्तल केली गेली. हा सर्व प्रकार भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर घडला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संघटित राहून या घटनेचा निषेध केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचार या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुर्गा वहिनी, धर्म जागरण मंच व सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.सूत्रसंचालन योगेश मखाना व राजश्री पिंगळे यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...