पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील जनतेला मी चांगल्या आरोग्यासाठी मदत केली, त्या गरीबांच्या आशीर्वादाने मी तीन महिन्यात राज्यात लौकीक मिळवू शकलो. सामान्य जनतेच्या आशीर्वादात प्रचंड ताकद असते. त्यामुळेच मी आज पुन्हा उभा आहे आणि त्याच ताकदीने कामाला लागलो आहे. पारनेरमध्ये आलो असल्याने मला आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा शेर मला म्हणावा लागेल आणि तो म्हटल्याशिवाय मी येथून जाणार नाही. ‘मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा!’ असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. राळेगण थेरपाळ येथील शिवमुद्रा पतसंस्थेचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. विखे यांनी ‘लौटकर वापस आऊंगा’ असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पारनेरमधील नव्या राजकीय समीकरणांची एक्सप्रेस धावणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुजय विखे पाटील हे खासदार निलेश लंके यांची कोंडी करण्यास सज्ज झाले असल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा रावडे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सोनाली सालके, सुरेश पठारे, संदीप पाटील वराळ, जनसेवा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, माजी सभापती गणेश शेळके, सहाय्यक निबंधक विकास जाधव, दादाभाऊ वारे, दत्ता पवार, दीपक ठोंबरे, सुभाष दुधाडे, राजू औटी, लहू भालेकर, नगरसेवक युवराज पठारे, निलेश खोडदे, लाभेश औटी, डॉ. श्रीकांत पठारे, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर, राजेंद्र वाघमोडे, राजेश गोपाळे, अंकुश गुंजाळ, बन्सी बढे, रोहिदास मेसे, असिफ इनामदार, दत्तात्रय कारखिले, पोपटराव कारखिले, अंकुश गुंजाळ, बाबाजी लंके, माऊली वरखडे, अस्लम इनामदार, प्रतिक वरखडे, विलासराव हारदे आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले. आभार बाबाजी ठुबे यांनी मानले.




