Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअकरावी प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांची प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर

अकरावी प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांची प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर

नाशिक | Nashik

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावीसाठी तात्पुरती संभाव्य गुणवत्तायादी जाहीर केली आहे. या यादीत २५ हजार ५६० विद्यार्थी पात्र ठरले आहे. तर नियमित फेरीची पहिली गुणवत्तायादी रविवारी (दि.३०) प्रसिध्द होणार आहे.

- Advertisement -

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संभाव्य गुणवत्तायादीत प्रवेश अर्जाचा भाग एक भरून लॉक आणि पडताळणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे. नाशिक मनपा हद्दीतील ५९ महाविद्यालयातील २५ हजार २७० जागांसाठी ३१ हजार ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २५ हजार ५६० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यापैकी २५ हजार ४७५ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. २२ हजार २४९ विद्यार्थ्यांनी शाखानिहाय महाविद्यालयांचा पर्याय नोंदविला आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रारूप गुणवत्ता यादी विद्यार्थ्याना त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रांतील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १२ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाचा भाग दोन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची रविवारी (दि.२३ )प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून यासोबतच अकरावीच्या नियमित प्रवेश फेऱ्यांमधील प्रथम प्रवेश फेरीस सुरुवात झाली आहे.

पात्र विद्यार्थ्यांची प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून २५ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्याना या यादीवर हरकती नोंदवता येणार आहे. या सर्व हरकतींवर शिक्षण उपसंचालक निर्णय घेऊन ३० ऑगस्टला प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या लॉगिन आयडीवर त्यांना मिळालेले महाविद्यालय कळणार आहे.

तसेच संबंधित महाविद्यालयांनाही त्यांच्या लॉगिनवर विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध होणार असून ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रथम फेरीतील अंतिम प्रवेश प्रकिया राबविली जाणार आहे. याच दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहीत संकेस्थळावर अपलोड करावी लागणार आहे.

ओटीपीची कालमर्यादा रद्द

शून्य फेरीदरम्यान विविध कोटांतर्गत प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना ओटीपी पाठविण्यात येतो. मात्र, शून्य फेरी शनिवारी (दि.२२) पूर्ण झाल्याने ओटीपीची कालमर्यादा रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ओटीपी घेऊन कोटा प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर अपडेट करण्यासाठी मंगळवारी (दि.२५) दुपारी ३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या