Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रDRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

DRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

पुणे | Pune

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) ज्येष्ठ शास्त्रज्ञाला एटीएसकडून अटक करण्यात आली असून हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर (वय ५९, रा. दिघी) असे या शास्त्रज्ञाचे नाव असून, ते दिघी येथील अभियांत्रिकी संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई- ई) संचालक आहेत. ही संस्था संरक्षण दलांना अभियांत्रिकीबाबत लागणाऱ्या सुविधांबाबतचे संशोधन करते. ती संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा (डीआरडीओ) एक भाग आहे. कुरुलकर यांच्याविरोधात ‘डीआरडीओ’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांनी तक्रार केली होती. त्यावरून ‘एटीएस’ने कुरुलकर यांना अटक केली.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

डॉ. कुरुलकर येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. ‘एटीएस’ने आतापर्यंत त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फारशी माहिती दिली नसली, तरी त्यांच्या समाजमाध्यमांवरील त्यांचे खाते; तसेच व्हॉट्सॲप क्रमांक यांच्या आधारे तपास करण्यात येत असल्याचा दावा ‘एटीएस’कडून करण्यात आला आहे.

शिर्डीतील ‘त्या’ तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले, सख्या भावानेच केला बहिणीचा खून

‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञाने ‘पीआयओ’च्या हस्तकांशी समाजमाध्यमांतून संपर्क साधल्याचे आणि व्हॉट्सॲपद्वारे व्हॉइस मेसेज, तसेच व्हिडिओ कॉल यांचा वापर करण्यात आला आहे, ‘एटीएस’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या ताब्यातील संवेदनशील माहिती त्यांनी अनधिकृतरीत्या पाकिस्तानला पुरवल्याचा दावा ‘एटीएस’कडून करण्यात आला आहे.

सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

हनीट्रॅप म्हणजे काय?

हनीट्रॅप (Honey Trap) हे खरे तर एक ‘हेरगिरीची पद्धत’ आहे. गुप्त माहिती मिळवण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जातो. यामध्ये साधारणपणे सुंदर मुलींचा वापर करुन व्यक्तींकडून गुप्त माहिती मिळवली जाते. फोटो, व्हिडिओ किंवा मेसेजच्या (Message) माध्यमातून ब्लॅकमेल केले जाते. यामध्ये मुली अनेकदा टार्गेट व्यक्तीला त्यांच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवतात आणि विशिष्ट मुद्द्यावर त्यांच्याकडून माहिती मिळवतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या