Friday, May 3, 2024
Homeनाशिकमारहाण करत दोन लाख लुटले अन...

मारहाण करत दोन लाख लुटले अन…

नाशिक । Nashik

ऑनलाईन चारचाकी गाडी बुक करून प्रवासाच्या बहाण्याने चार जणांच्या टोळक्याने चालकास मारहाण करत चारचाकी गाडीसह 2 लाख 15 हजाराची लूट केल्याची घटना मंगळवारी (दि.25) घडली.

- Advertisement -

याप्रकरणी राहुल प्रदिप फेगडे (28, रा. उत्तमनगर, नवीन नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चार संशयितांनी सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला कंपनीच्या अ‍ॅपवरून ऑनलाईन चारचाकी गाडी बुक केली. या गाडीचे चालक फेगडे यांनी 24 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता चौघांना पंचवटीतील मंडलीक मळा येथे जाऊन गाडीत बसवले. संशयितांनी रात्री गाडी सिन्नरला न नेता शिर्डीला घेऊन जाण्याची जबरदस्ती फेगडे यांना केली.

दरम्यान प्रवासात फेगडे यांचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दोन दिवस गाडी फिरवून फेगडे यांना तीस हजार रूपये दिले तर गाडी तुला परत देऊ अशी धमकी दिली व त्यांच्याकडील एटीएम, दोन मोबाईल काढून घेत त्यांना गाडीतून खाली फेकाण्यात आले. व संशयितांनी फेगडे चालवत असलेली महिंद्रा वेरीटो कार क्र. एमएच 15 ई 7837 घेऊन पलायन केले.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक व्ही. व्ही. गिरी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या