Monday, September 28, 2026
HomeनगरAhilyanagar : ट्रिगर-1 म्हणजे काय?

Ahilyanagar : ट्रिगर-1 म्हणजे काय?

दुष्काळी उपाययोजनांसाठी महत्वाचा निकष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यांमध्ये ट्रिगर-1 लागू करण्यात आला आहे. पावसाची मोठी तूट, पावसाचा दीर्घ खंड आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम यांसारख्या परिस्थितीत दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यासाठी ट्रिगर-1 महत्त्वाचा निकष मानला जातो.
ट्रिगर-1 लागू झाल्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि शेतकर्‍यांना विविध सवलती व उपाययोजना लागू करता येतात.

- Advertisement -

मात्र, या सवलती आपोआप सर्वांना मिळतात असे नाही. संबंधित विभागांकडून शासन निर्णयानुसार त्यांची अंमलबजावणी केली जाते. यामुळे शेतकर्‍यांना जमीन महसुलात सवलत मिळणार असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना जमीन महसुलात सवलत देण्याची तरतूद आहे. तसेच शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. कर्जवसुलीस स्थगिती, वीजबिलात सवलत, परीक्षा शुल्कमाफी, टँकरने पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, रोजगाराच्या कामांना चालना, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, वीजपुरवठा खंडित न करण्याच्या उपाययोजना यांचा समावेश आहे.

पीक नुकसानीसाठी स्वतंत्र मदत ही पीक नुकसानभरपाई ही ट्रिगर-1 लागू झाल्याने थेट मिळत नाही. त्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे आणि शासनाने निश्चित केलेले मदतीचे स्वतंत्र निकष लागू राहतात. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी मदत देण्याची स्वतंत्र प्रक्रिया मदत व पुनर्वसन विभागाने नमूद केली आहे.

ट्रिगर-1 म्हणजे थेट नुकसानभरपाई नव्हे
ट्रिगर-1 हा दुष्काळाची परिस्थिती ओळखून तातडीच्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना सुरू करण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना विविध सवलती आणि सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र, पीक पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्यासाठी स्वतंत्र पंचनामा आणि शासनाच्या मदतीचे निकष पूर्ण करावे लागतात, असे महसूल आणि कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...