Thursday, May 2, 2024
Homeनाशिकरामेश्वरात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

रामेश्वरात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

देवळा । Deola

तालुक्यातील रामेश्वर येथील धरणात बुडून मृत झालेल्या युवकाचा मृतदेह आज दुसर्‍या दिवशी दुपारी दिड वाजेच्या सुमारास शोधून बाहेर काढण्यास मालेगाव अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. यासाठी स्थानिक पोहणार्‍या तरूणांनी मदत केली.

- Advertisement -

धरणावर अंघोळीसाठी गेलेल्या विठेवाडीरोडवरील सरस्वतीवाडी येथील केशव नामदेव अहिर हा 22 वर्षीय युवक धरणाच्या खोल पाण्यात बुडाला होता. युवक धरणात बुडाल्याची खबर मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय मातोंडकर यांनी पथकासमवेत घटनास्थळी धाव घेत लोहणेर व स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला असता मृतदेह हाती लागला नव्हता.

त्यामुळे आज मालेगाव मनपा अग्निशमन दलातील पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील शकील शाबीर यांनी स्थानिक पोहणार्‍या कार्यकर्त्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून मृतदेहाचा शोध घेऊन त्यास पाण्याबाहेर काढले.

मृतदेहावर ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद पोलिसांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या