Saturday, October 24, 2026
HomeनगरCrime News : शेवग्याच्या पिकात गांजाची लागवड

Crime News : शेवग्याच्या पिकात गांजाची लागवड

5 किलो वजनाची अडीच लाखाची झाडे जप्त || दोघांवर गुन्हा दाखल

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

शेवग्याच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार नेवासा तालुक्यातील वाटापूर येथे उघडकीस आला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 2 लाख 55 हजार रुपये किमतीची 5 किलो 100 ग्रॅम वजनाची गांजाची लहान-मोठी झाडे जप्त केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

रखमाजी कुशाबा आयनर (वय 81) रा. वाटापूर, ता. नेवासा यांनी वाट्याने घेतलेल्या शेतात शेवग्याच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोनई पोलीस ठाण्याला माहिती कळवून कारवाईची तयारी केली.
21 ऑक्टोबर रोजी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संबंधित शेतात छापा टाकला.

यावेळी शेवग्याच्या झाडांमध्ये गांजाची लहान-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 5.10 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी रखमाजी कुशाबा आयनर यांच्यासह सोपान गुजाबा रूपनर (वय 46) रा. अंमळनेर, ता. नेवासा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 453/2026 अन्वये अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, विकास साळवे, अशोक लिपणे, रमीझराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, ज्योती शिंदे तसेच सोनई पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...