ओझे | विलास ढाकणे | Oze
सतत दोन वर्ष खरीप हंगामात टोमॅटोला कवडीमोल बाजार मिळत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिलेच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे बळीराजासाठी यंदाची दिवाळी पुन्हा अंधारात जाणार यात शंका नाही.
दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्यात खरिप हंगामात टोमॅटो पिकाचे क्षेत्र दिवसोदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सध्या बाजारमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक होत असल्याने संपूर्ण खरिप हंगामात बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून दिवसेंदिवस बाजारभाव पडताना दिसत असून सध्या टोमॅटो वीस किलो जाळी ४० ते ६० रुपयांना विकली जात आहे. ६० रुपयांना विकली तर मजुरी वीस, गाडीभाडे वीस व शेतकरी वीस अशा पद्धतीने समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे…
सध्याच्या परिस्थितीत वातावरण होणाऱ्या सततच्या बदलामुळे टोमॅटो पिकाला द्राक्षबागेच्या तोडीत खर्च होत असल्यामुळे हवालदिल झाला असून लागवडीपासून टोमॅटो पिक सुरु होईपर्यंत एक ते सव्वा लाख रुपये खर्च होत असतो. गेल्या दोन वर्षांच्या खरिप हंगामाचा विचार केला तर उत्पादक खर्च सुद्धा निघालेला नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे.
त्यात जवळजवळ दोन ते अडीच वर्ष करोना महामारीत शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून शेती व्यवसाय मोडकळीस येतो कि काय आशी भिती निर्माण होत आहे. प्रत्येक हंगामात उसणवारी करून सोने गाहन देवून हंगाम घेता जातो मात्र बाजार भावामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतीसाठी भांडवल कसे उभे करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Manoj Jarange Patil : “मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे…”; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल
शेती व्यवसायात दिवसेंदिवस वाढती मजुरी, रासायनिक खते व औषधांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, मशागतीसाठी लागणारा खर्च, पिकांची लागवड, पिकांची तोडणी, वाहतूक अशा सर्व बाबींचा विचार करता शेती व्यवसाय तोट्यात असून तो एका धोक्याच्या वळणावर येवून उभा आहे. मात्र राजकीय व्यवस्था कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्यास तयार नाही.
भारत हा कृषी प्रधान देश आहे असे बोलले जाते. मात्र बळीराजाच्या अडचणी समजून घेण्यास कुणी तयार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये टोमॅटोला भाव नसल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था ठप्प झालेली आहे.
सध्याच्या परिस्थितीत देशात आणि राज्यात केवळ सत्ता संघर्षाचे राजकारण सुरु असून शेतकरी मात्र वाऱ्यावरच आहे. त्यांच्या कुटूंबाला काही खर्चच नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्याने फक्त पिकवायचे, बाजारभावाचा विचार करायचा नाही, अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून दिसत आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Nashik Road News : बिटको रुग्णालयासमोर शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने
त्यात प्रत्येक नवीन वर्षात नैसर्गिक आपत्ती पचणीला पुजलेली असून त्यात गारपीट, बेमोसमी पाऊस हे संकटे शेतकरी वर्गाला उद्ध्वस्त करीत आहेत. त्याची साधी नुकसानभरपाई नाही आणि मिळाली तर तुटपुंजी. त्यामुळे शेतकरी उभा राहू शकत नाही. आज शेतकरी वर्गापुढे कुटुंबातील मोठमोठ्या समस्या असून त्यात मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजार, शेतीचा खर्च, मुला-मुलीचे लग्न अशा समस्या निर्माण झाल्या असून केंद्रशासन व राज्यशासन याचा गांभीयाने विचार कधी करणार? आशी चर्चा सध्या शेतकरी वर्गात होत आहे.
ठळक मुद्दे
१) राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यातील कोऱ्या उताऱ्यातील घोषणा फेल.
२) लोकसभेच्या निवडणुकीत कांदा, टोमॅटोच्या भावाच्या घसरणीचा मुद्दा गाजणार.
१) दोन खरिप हंगामात टोमॅटोला मातीमोल भाव.
३) रासायनिक खते व औषधांचे गगनाला भिडलेले बाजारभाव.
४) शेती मालाच्या भावात दोन वर्षांपासून सतत घसरण.
५) कोणत्याच पिकाला हमीभाव नाही, परिणामी शेतकरी कर्जबाजारी.
६) बँकांकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज थकले.
७) बँकांकडून घेतलेले कर्ज परत न गेल्यामुळे जमिनीच्या लिलावाच्या बँकांकडून धमक्या.
८) शेतकऱ्याच्या बांधावर जमीन जप्तीचे फलक.
10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा