Thursday, May 9, 2024
Homeजळगावदुर्देवी : अंस काय घडलं कि विहीरीत उडी मारून माय लेकीने केली...

दुर्देवी : अंस काय घडलं कि विहीरीत उडी मारून माय लेकीने केली आत्महत्या

कळमसरे, Kalamsaray ता. अमळनेर

कळमसरे येथे आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमसरे निम रस्त्यावर (Kalamsaray Nim Road) सबस्टेशन जवळ  असलेल्या भाकचंद जैन (Bhakchand Jain)  यांच्या विहीरीत (well) निम (Nim) येथील रहिवासी जयश्री समाधान कोळी वय ( ३० ) मुलगी नंदिनी समाधान कोळी वय ( ८ ) या माय लेकीने (mother and daughter) उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.       

- Advertisement -

    निम ता. अमळनेर येथिल  समाधान जहांगीर कोळी याची पत्नी  जयश्री समाधान कोळी  व मुलगी नंदीनी समाधान कोळी  हीने कळमसरे शिवारात  सबस्टेशन समोरील निम रस्त्याला लागूनच असलेल्या भाकचंद जैन यांचा  शेताच्या विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.  सदर जयश्री कोळी ही तीन वाजता कळमसरे बसस्टँड वर  मुलीला घेवून बसली होती. मुलीला बिस्कीट व पाणीची बाटली घेवून पायी पायी निम  गावाकडे रस्त्याकडे  निघाली होती. दोघींच्या पायात चप्पल पण नव्हती. कळमसरे गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरूवातीला मुलीला विहरीत लोटले  व नंतर स्वतः उडी मारली असल्याची चर्चा  परीसरात सुरु आहे. जयश्री कोळीला अजून  एक ४ वर्षाचा मुलगा आहे तो तिच्या माहेरी मामाकडे जैनाबाद जळगाव येथे इंग्लिश मिडीयमला शाळेत शिकत असतो.

मुलगा मामाच्या गावाला असल्याने त्याचा जीव वाचला. नवरात्रीच्या आज  नवमीच्या दिवशी जयश्रीने मुलीला सोबत घेत  आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जयश्री चा पती  समाधान जहांगीर कोळी हा  रोजंदारीने दुसऱ्याकडे  मोल मजूरी करायचा.  जयश्री ची सासू हिराबाई कोळी सप्तशृंगी गडावर आज देवदर्शनासाठी गेेली होती.  मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात पाठवले असून  मारवड पोस्टेला अकस्मात मृत्यूची दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सपोनी जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुकेश साळुंखे करीत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या