Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदसरा मेळावा : आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, फेस टू फेस …- मुख्यमंत्री...

दसरा मेळावा : आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, फेस टू फेस …- मुख्यमंत्री शिंदे

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज संध्याकाळी आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता . मराठी आपला श्वास, हिंदुत्व आपला प्राण असे म्हणत शिंदे गटाने मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. त्यामुळे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे, अशी सुरुवात करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याची केली. आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाइव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत.असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हिंदू हृदय सम्राटबाळासाहेब म्हणाले होते, अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता.असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपण पहिल्या नंबरवर राज्य आणलं. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी, अशी टोलेबाजी दाढीवरील टीकेवरुन एकनाथ शिंदेंकडून यांनी यावेळी केली. येणाऱ्या निवडणुकीत हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही पुरनरावृत्ती होणार असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...