Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशपालघर, अरुणाचल प्रदेश, टर्कीत भूकंपाचे धक्के

पालघर, अरुणाचल प्रदेश, टर्कीत भूकंपाचे धक्के

मुंबई | Mumbai

जगभरात आज ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यासह अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि टर्की (Turkey) देशात भूंकप धक्क्यांची नोंद झाली आहे…

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील भूकंप धक्क्यात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र अरुणाचल प्रदेश आणि टर्की येथील भूकंप धक्क्यांमुळे झालेल्या हानीबद्दल निश्चित माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पालघरमधील भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे.

‘डॅडी’बाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अरुणाचल प्रदेशमधील बासर भागापासून ५८ किमीवर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल होती. टर्की देशातही भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत.

टर्कीची राजधानी असलेल्या अंकारा शहरापासून जवळपास १८६ किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केल असून पहाटे ६.३८ वाजता हे भूकंप धक्के बसले.

तारक मेहता फेम ‘बबिता’चा अपघात

पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या