Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

मुंबई | Mumbai

येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा १० जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला असं कळवलंय की, आता काय उद्धव ठाकरेंचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिलेला नाही. आता ते मला खासदार बनवू शकत नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिलेला नाही. म्हणून माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्या. ज्या दिवशी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला तेव्हा संजय राऊत यांना त्यांच्यासोबत बसायचं होतं. त्यामुळे त्यादिवशी सकाळपासून संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होता.

शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

तसेच, पण शरद पवार हे फोन उचलत नव्हते. त्यानंतर संजय राऊत संध्याकाळी तडकाफडकी सिल्व्हर ओकवर गेले. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय की संजय राऊत हे साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत बसलेले होता. संजय राऊत हे बाळासाहेबांचे झाले नाहीत. ते तुमचेही होणार नाहीत. राऊत यांनी बाळासाहेबांच्या काळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात भांडणं लावली. त्यानंतर आता तेच उद्धव ठाकरेंच्या कुटुंबात करताहेत. संजय राऊत हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. तसेच एका माणसामुळे आपण किती लोकांना तोडलं याची जाणीव उद्धव ठाकरेंना होईल, असं नितेश राणे म्हणाले.

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या… घटनेचा Video व्हायरल

दरम्यान यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. बारसू बळजबरीनं लादल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी महाविकास आघाडीची मदत न घेता स्वत:च्या ताकतीवर आधी मुंबई बंद करून दाखवावी असं चॅलेंज नितेश राणे यांनी ठाकरेंना दिलं आहे.

DRDO च्या शास्त्रज्ञाला ATS कडून अटक, हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

- Advertisment -

ताज्या बातम्या