Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केला आहे. याआधीच्या कार्यक्रमानुसार २८ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. आता सुधारित निर्णयानुसार ही यादी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी महापालिका प्रशासन आता ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. तसेच या प्रारुप यादीवर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती आणि सूचना मागवून ६ जानेवारी रोजी हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ जानेवारीला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ जानेवारीला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Pune News : माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत…; नसरापुर...

0
पुणे |प्रतिनिधी| Pune पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasarapur) येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील पीडित...