Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Elections 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार;...

Assembly Elections 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार; निवडणुक आयोगाची ३.३० वाजता पत्रकार परिषद

मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (१५ ऑक्टोबर) दुपारी ३.३० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगा आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील निवडणूक एक किंवा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोग एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यासाठी प्रयत्नशील असू शकते. तसेच, झारखंडमध्ये दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. सुरक्षेची कोणतीही कमी नाही, तसेच झारखंडमधली परिस्थितीही सामान्य आहे, त्यामुळे झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात. दिवाळी आणि छट पुजा लक्षात घेऊनच निवडणूक आयोग तारखा निश्चित करु शकते.

दरम्यान, राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राज्यात सहा मोठे पक्ष या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही या निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेवून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या