Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रठरलं ! 'या' तारखेला होणार दहावी, बारावीच्या परीक्षा

ठरलं ! ‘या’ तारखेला होणार दहावी, बारावीच्या परीक्षा

मुंबई | Mumbai

दहावी, बारावी परीक्षा नेमक्या कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे.

- Advertisement -

बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या