Sunday, May 19, 2024
Homeधुळेबाळापूर येथे वखारीला आग ; लाखोंचे नुकसान

बाळापूर येथे वखारीला आग ; लाखोंचे नुकसान

धुळे | प्रतिनिधी Dhule

तालुक्यातील बाळापूर शिवारातील वखारीला आज पहाटे भिषण आग लागली. त्यात यंत्र सामुग्रीसह लाकूड जळून खाक झाले. त्यात आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान मनपाच्या अग्नीशमन विभागांच्या बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. घटनेत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. याबाबत तालुका पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद करण्याचे काम सुरू होते. बाळापूर गाव शिवारात रामकृष्ण वुड वर्क नावाची वखार आहे. दि. ९ रोजी पहाटे चार वाजेनंतर वखारीला अचानक आग लागली. आगीत लाकूड सापडल्याने आगीने रौंद्ररुप धारण केले. आगीचे मोठे लोळ उठत असल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी काहीनी मनपाच्या अग्नीशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करीत सुमारे अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत वखारीतील लाखो रुपयांची यंत्रसामुग्री, कापलेले तसेच साठवलेले लाकूड असा सुमारे ९ ते १० लाख रुपयांचा साठा जळून नुकसान झाले आहे. आगीचे कारणही समजू शकलेले नाही. याबाबत धुळे तालुका पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या