Friday, May 17, 2024
Homeनाशिकअकरावीच्या साडेआठ हजार जागा रिक्तच

अकरावीच्या साडेआठ हजार जागा रिक्तच

नाशिक | Nashik

मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रसिद्ध केलेल्‍या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया संपली आहे.

- Advertisement -

या फेरीत ४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. आतापर्यंत झालेल्‍या फेऱ्यांपैकी सर्वाधिक प्रवेश या फेरीतून झाले आहेत. तसेच अद्याप ८ हजार ६६२ जागा रिक्‍त असून, यासाठी दुसरऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी (दि.५) प्रसिद्ध केली जाणार आहे. अकरावी प्रवेशाच्‍या यापूर्वी झालेल्‍या तीन फेऱ्यांनंतर रिक्‍त जागांसाठी विशेष फेरी राबविण्यात आली होती.

या गुणवत्ता यादीत ४ हजार ९१० विद्यार्थ्यांच्‍या नावाचा समावेश होता. यातून ४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. यापैकी ३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी यादीनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतले. तर ५५८ विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत आपले प्रवेश निश्‍चित केले.

दोन विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले. कनिष्ठ महाविद्यालयात २५ हजार २७० जागा उपलब्‍ध होत्या. तर आतापर्यंत झालेल्‍या एकूण चार फेऱ्यांमध्ये १६ हजार ६०८ विद्यार्थ्याानी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. उर्वरित ८ हजार ६६२ जागांसाठी दुसरी विशेष फेरी राबविली जात आहे.

दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक
रिक्‍त जागांसाठी राबविल्‍या जात असलेल्‍या दुसऱ्या विशेष फेरीत (दि.१) महाविद्यालये रिक्‍त जागांचा तपशील जारी करतील. तर विद्यार्थ्यााना अर्जाचा भाग एक भरणे, आणि महाविद्यालय प्राधान्‍यक्रम निवडीकरीता भाग दोन भरण्यासाठी आज (दि.१) पासून सोमवार (दि.४) पर्यंत मुदत दिली जाणार आहे.

या दरम्‍यान बायफोकलकरीता प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पार पाडता येईल. दरम्‍यान या फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी (दि. ५) प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी बुधवार (दि.६) पासून ८ जानेवारीपर्यंत मुदत असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या