Sunday, June 21, 2026
HomeनगरRahata : राहाता तालुक्यातील 22 गावांची पोलीस पाटील भरती रखडली

Rahata : राहाता तालुक्यातील 22 गावांची पोलीस पाटील भरती रखडली

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal

राहाता तालुक्यातील 22 गावांच्या रिक्त झालेल्या पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया रखडली आहे. भरतीसाठी आरक्षण सोडतीही पार पडल्या आहेत. मात्र राजकीय अनास्थेमुळे भरती प्रक्रिया गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या आहेत. तालुक्यातील गोगलगाव, दाढ बुद्रुक, पिंप्री लौकी, हसनापूर, लोहगाव, पिंपरी निर्मळ, तिसगाव, पिंपळवाडी, रूई, नांदुर्खी बु., केलवड बु., एकरूखे, शिंगवे, रांजणगाव खुर्द, धनगरवाडी, लोणी बु., रामपूरवाडी, आडगाव बु., पाथरे बु. पिंपळस, नांदूर खु, चंद्रापूर या गावांच्या पोलीस पाटलांची मुदत संपल्याने या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.

- Advertisement -

महसूल विभागाने भरती प्रक्रिया अंतर्गत संबंधित गावातील यंत्रणा व ग्रामसभांमार्फत त्या त्या गावातील जातीनिहाय लोकसंख्येची आकडेवारी संकलित करून यापूर्वी प्रसिद्ध केलेली आहे. या माहितीच्या आधारे आरक्षणाच्या टक्केवारी नुसार त्या गावांमध्ये आरक्षणाच्या सोडतीही उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी जाहीर केल्या आहेत. संबंधित आरक्षण सोडती होऊन जवळपास दोन वर्ष उलटून गेलेले आहेत.

मात्र पोलीस पाटील भरती प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. मानधनापेक्षाही ग्रामीण भागात पोलीस पाटील हे पद प्रतिष्ठेचे समजले जात असल्याने अनेक दिग्गज मंडळी निवड प्रक्रियेकडे लक्ष लावून बसली आहेत. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही तयार होत आहेत. इतर सर्व भरती प्रक्रिये बरोबरच शासनाने प्रलंबित पोलीस पाटील भरती प्रक्रियाही राबवावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पुनर्परीक्षेसाठी प्रशासन टाईट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत नगरला आज रविवार, (दि. 21) 12 परीक्षा केंद्रांवर नीट 2026 पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 5...