Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत...”; एकनाथ शिंदेंचं ट्वीट

“भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत…”; एकनाथ शिंदेंचं ट्वीट

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) बुधवारी कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद करतानाच राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. आता भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसं असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे.

यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या