Wednesday, January 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: जय हिंद, जय महाराष्ट्र…जय गुजरात! अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी घोषणा

Eknath Shinde: जय हिंद, जय महाराष्ट्र…जय गुजरात! अमित शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी घोषणा

पुणे | Pune
राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्याच चुकीने अंगावर नसते संकट ओढावून घेतले आहे. आज पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी याच कार्यक्रमात जय गुजरातचा नारा दिलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत कोंढवा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाषणात अमित शहांचे तोंडभरुन कौतुक केले. भाषणाचा समारोप करताना त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशा घोषणा दिल्या. शिंदेंनी दिलेल्या जय गुजरात घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातच्या दिलेल्या घोषणेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापणार असून विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरुन प्रचंड मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणादरम्यान म्हणाले की, “13 वर्षांपूर्वी लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या हस्ते या गुजराती भवनाचे या वास्तूचे भूमीपूजन आणि आज लोहपुरूष गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदी ज्या ज्या कार्यक्रमांचे भूमीपूजन करतात ते वेगाने पुर्ण होतात. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी वेगळे नाहीत तर मोदींचे प्रतिबिंब अमित शाह आहेत,” असे ते म्हणाले.

YouTube video player

महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गुजराती हे व्यावसायिक, उद्योजक आहेत. गुजरातींशिवाय कोणत्या शहराची शोभा वाढू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गुजराती हा लक्ष्मीपुत्र आहे.” असे ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, या एका घोषणेमुळे उद्घाटन सोहळ्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचीच चर्चा अधिक रंगली आहे.

नेमके काय घडले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील एका भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या ओघात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना अचानक ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

0
बारामती | Baramati उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत...