Sunday, October 6, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा

दिला 'हा' निर्णय

नवी दिल्ली | New Delhi

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्रात (Maharashtra) १० पैकी ८ जागा जिंकून राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission) मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “लंडनमधून भारतात येणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत”; ‘या’ इतिहास संशोधकाचा मोठा दावा

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या पक्षाला कलम २९ B नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. तसेच लोकसभेसाठी तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेले ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे चिन्हही आता यापुढे कायम राहणार आहे.

हे देखील वाचा : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

दरम्यान, या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,”आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या.शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले.त्याबद्दल जनतेचे आभार मानते. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते.पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. तसेच कर लाभ सुद्धा मिळत नव्हते.आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे”, असे त्या म्हणाल्या आहेत.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या