Friday, September 20, 2024
Homeराजकीयनाशिकच्या 'त्या' प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले 'हे' निर्देश

नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

मुबंई | Mumbai

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) हरनुल टोल नाक्याजवळ मद्यसाठ्याची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाच्या गाडीला कट मारल्याने पथकाची गाडी उलटून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना आज सकाळी घडली होती.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन 

या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू (Death) झाला असून पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) घडलेल्या या ‘हिट अ‍ॅण्ड रन’च्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणाची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे नाेंद

मंत्री देसाई यांनी या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीमला विदेशी बनावटीची दारू एका वाहनात (Vehicle) असल्याचा माहिती मिळाली होती. त्यानंतर ते या वाहनाचा पाठलाग करत होते. मात्र, या टीमवर त्या वाहनाच्या चालकाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत,असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा

तसेच आमच्या विभागाकडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मदत केली जाईल.पंरतू, आमची जी मोहीम सुरू आहे ती तशीच चालू राहणार आहे. कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍याचा (Worker) जीव घेणे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला धडक दिलेले वाहन अजून सापडलेले नसून पोलीस शोध घेत आहेत, अशी माहितीही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या