मुंबई | Mumbai
राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषद अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांना एक दिवस उरलेला असताना पुढे का ढकलल्या. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा खुलासा केला आहे.
राज्यातील एकूण २४ नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. मात्र, या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. 17 1(ब) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या, त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकल्याची माहिती आयोगामधील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम ‘क’ आणि ‘ड’ प्रमाणे देण्यात आला आहे आणि त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. राज्यातील २४ नगरपालिका मधील नगराध्यक्ष आणि १५० च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली आहे. नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार, त्यामुळे तिथे एकदाच मतदान होणार काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रभागातील निवडणुकांसाठी दुसऱ्यांदा मतदान कराव लागणार आहे.
जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या 24 निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत अहवाल सादर करण्यास सांगितला असून कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची सूत्रांची माहिती आहे. पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार. चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल असेही सांगण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





