Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशECI On Rahul Gandhi: राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणुक आयोगाने हवा काढली;...

ECI On Rahul Gandhi: राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची निवडणुक आयोगाने हवा काढली; कोणालाही, कोणत्याही मतदाराला…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्होट चोरीचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह मतदारांची नावे जाणिवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.

राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला. तसेच कॉल सेंटरच्या मदतीने मतदारांची नावे कापण्यात आल्याचा राहुल गांधी यांनी केलेला आरोपही निवडणूक आयोगाने फेटाळून लावला असून, असे करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी कशी व्होट चोरांना लोकशाहीविरोधातील लोकांना कशी मदत केलीय, मतचोरी कशी झाली, मते कशी बदलली हे पुराव्यानिशी मांडणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणुक आयोगाने काय म्हंटले?
केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर ५ मुद्यांसह उत्तरे दिली. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. कोणलाही, कोणत्याही मतदाराला ऑनलाइन पद्धतीने कोणतेही मत वगळता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने पुढे म्हटले की, संबंधित व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही मत वगळता येणार नाही.

YouTube video player

२०२३ मध्ये आलंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे हटवण्याचे काही प्रयत्न झाले होते. या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वत: तक्रार दिली होती, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली. दरम्यान, २०२३ साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आलंद मतदारसंघात काँग्रेसचे बी.आर. पाटील विजयी झाले होते.

राहुल गांधींनी काय आरोप केले?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मतचोरीचा गंभीर आरोप केला. यावरूनच त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतचोरी करणाऱ्यांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी मतचोरीची प्रोसेस दाखवत पुरावे देखील दाखवले. त्याचसोबत त्यांनी मतदारांना देखील समोर आणले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...