Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले 'हे' चिन्ह

मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह

नवी दिल्ली |New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या (by-elections) पार्श्वभूमीवर शिवसेना (shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांना नावं देण्यात आली होती…

- Advertisement -

त्यात उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र शिंदे गटाच्या (Shinde group) चिन्हाबाबत (symbol) निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल-तलवार (Shield-Sword) हे चिन्ह देण्यात आले आहे.

दरम्यान, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे तळपता सुर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड, हे तीन पर्याय पाठवले होते. त्यानंतर या तीन पर्यायांपैकी निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb’s ShivSena) असे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या