Wednesday, June 10, 2026
Homeमुख्य बातम्याElection Result 2026 : भाजपची तीन राज्यांत सत्तेकडे वाटचाल; काँग्रेस आणि अभिनेता...

Election Result 2026 : भाजपची तीन राज्यांत सत्तेकडे वाटचाल; काँग्रेस आणि अभिनेता विजय थलपतीच्या TVK ला चांगले यश मिळणार!

नवी दिल्ली | New Delhi

देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांचा निकाल जाहीर होत आहे. या पाचही ठिकाणी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी (Vote Counting) सुरु झाली असून, सकाळी १०. वाजेपर्यंतच्या कलांनुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी या तीन राज्यांत भाजप (BJP) सत्तेकडे वाटचाल करतांना दिसत आहे.

- Advertisement -

दुसरीकडे तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) सत्तापालट होतांना दिसत असून तिथे अभिनेता विजय थलपतच्या टीव्हीके पक्षाकडे सत्तेच्या चाव्या जाताना दिसत आहे. तर सत्ताधारी स्टालिन यांच्या द्रमुकला जोरदार धक्का बसताना दिसत आहे. याशिवाय केरळमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता येतांना दिसत असून, सत्ताधारी डाव्या आघाडीला मोठा धक्का बसताना बघायला मिळत आहे.

सध्याच्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजप २९३ पैकी १६० जागांवर आघाडीवर आहे. तर ममता यांचा तृणमूल काँग्रेस ११७ जागा आणि इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत. तर तामिळनाडूत अभिनेता विजय थलपतीचा टीव्हीके पक्ष १०५, भाजप आघाडीचा अण्णा द्रमुक पक्ष ८० आणि स्टालिन यांचा पक्ष ४९ जागांवर आघाडीवर आहे.

तसेच केरळमध्ये काँग्रेस आघाडीला १०१, माकपला ९५ आणि भाजपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर आसामध्ये भाजप ९५ आणि काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर असून पद्दुचेरीमध्ये भाजप २२ आणि काँग्रेसला ७ जागा मिळताना दिसत आहेत.

दरम्यान, सध्याच्या कलांनुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलपती यांचा पक्ष सत्तेकडे वाटचाल करताना दिसत आहे. हे कल असले तरी ही आकडेवारी पुढील काही तासांत बदलण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या