Thursday, July 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAccident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

येथील विंचूर चौफुली परिसरातील आसरा हॉटेलजवळ कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिंपळगाव जलाल येथील दुचाकीस्वार वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसंत संभाजी वाघ (वय ७७, रा. पिंपळगाव जलाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

गुरुवारी, (दि. ९) दुपारच्या सुमारास वसंत वाघ हे आपल्या टीव्हीएस मोटारसायकल (क्रमांक एमएच १३ बी ४१६३) वरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक – आरजे ३२ जीइ ०९७६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात वाघ गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाघ यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

ताज्या बातम्या

दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbaiराज्य प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी सध्या उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त आहेत. मंत्रालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत पावसाचे घाण...