मुंबई | Mumbai
लोकसभेनंतर (Loksabha) आता राज्यात काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, त्याआधी उद्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) ११ जागांसाठी निवडणूक होणार असून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ला ऊत आला आहे.
हे देखील वाचा : विधानसभेला मविआचे किती आमदार निवडून येणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक लागली आहे. त्यातच आता राज्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. कारण विधानपरिषदेसाठी छुप्या पद्धतीने मतदान (Voting) होणार असल्याने क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) घटक पक्षांसह महायुतीमधील (Mahayuti) पक्षांना दगाफटका होण्याची भीती आहे. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीची २३ मते आवश्यक आहेत. अशा स्थितीत प्रत्येक पक्ष २३ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
हे देखील वाचा : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या कॅमेऱ्यासमोर; म्हणाल्या, “मी काम…”
सध्या २८८ पैकी महाराष्ट्र विधानसभेत २७४ आमदार (MLA) आहेत. यात पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास भाजपचे १०३ आमदार आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४० आणि शिदेंच्या शिवसेनेचे ३८ आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे १२,उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे १५ आणि काँग्रेसकडे ३७ आमदार आहेत. तसेच बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २, मनसे ०१, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया ०१, नॅशनल सोसायटी पार्टी ०१, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ०१, क्रांतिकारी शेतकरी पक्ष ०१, जन सुराज्य शक्ती ०१ आणि अपक्ष १३ आमदार आहेत. त्यामुळे उद्या महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी छोट्या पक्षांवर देखील अवलंबून राहावे लागणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
कोणत्या पक्षाकडून कोण रिंगणात?
भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. यात पंकजा मुंडे, परिणय फुके सदाभाऊ खोत,अमित गोरखे, योगेश टिळेकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर मैदानात आहेत. तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे उमेदवार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, कॉंग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील रिंगणात आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात असल्याने कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच सुरु आहे.
हे देखील वाचा : Nashik News : ट्रक दुकानात शिरल्याने एकाचा चिरडून मृत्यू
क्रॉस व्होटिंगचा धोका कोणाला?
क्रॉस व्होटिंगचा सर्वात मोठा धोका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडून वर्तवला जात आहे.कारण लोकसभा निवडणूक झाल्यापासून अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधान परिषदेसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.तसेच विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले तर त्याचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थित उमेदवार जयंत पाटील यांना होऊ शकतो.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा