Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik News : ट्रक दुकानात शिरल्याने एकाचा चिरडून मृत्यू

Nashik News : ट्रक दुकानात शिरल्याने एकाचा चिरडून मृत्यू

सापुतारा | प्रतिनिधी | Saputara

सापुतारा-वघई (Saputara Waghi) आंतरराज्य घोरी मार्गावर (Ghori Way) ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून शामगहान गावातील तीन दुकानात शिरल्याने त्यात एक ठार तर तीन जखमी झाले आहेत. यातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : तरुणास मारहाण केल्याप्रकरणी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार (दि.१०) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नाशिककडून सुरतकडे (Nashik To Surat) धान्याचा पुरवठा घेवून जाणारा ट्रक (क्र.जी.जे. ०९ यु ११००) नियंत्रण सुटलेल्या ट्रकने (Truck) डिव्हायडर तोडून जीपला धडक दिली. यात तीन दुकाने फोडली आणि मोटारसायकलसह एका व्यक्तीला ट्रकखाली चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला.

हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या अपघातात (Accident) शामगहान येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झाला. ते दीड महिन्यापूर्वी रेल्वे पोलीस वलसाडमध्ये नोकरी करून निवृत्त झाले होते. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली होती.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या