Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हयातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

जिल्हयातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्याच्या सहकार विभागाने ( State Cooperative Department) राज्यामधील पूरस्थिती (Flood Situation) आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे राज्यभरातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित(Co-operative elections postponed) झाल्या असून यात नाशिक जिल्हयातील ४१ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

- Advertisement -

यामध्ये प्रामुख्याने जिल्हयातील अर्बन बँकां, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू होत्या.तर, नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी पतसंस्थेसाठी रविवारी (दि.१७) मतदान होणार होते. मात्र, या निर्णयामुळे ही प्रक्रीया स्थगित झाली आहे.

करोना संकटामुळे गत दोन वर्ष अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सहकार प्राधिकरणाने रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रारंभ केला. यात बहुतांश जिल्हा बँकांच्या निवडणुका पार पडल्या. तर, बाजार समित्यांच्या निवडणुक प्रक्रीयेसाठी विकास कार्यकारी सोसायटी,ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू होत्या.

मात्र, राज्यातील आतिवृष्टी अन त्यामुळे ओढावलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे नाशिकमधील सुरू असलेल्या ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. यात ओझर मर्चंट को-आ‍ॅ‍ॅप बँक, पिंपळगाव मर्चट, येवला मर्चट, मालेगाव मर्चंट को-आ‍ॅ‍ॅप, निफाड अर्बन को-आ‍ॅ‍ॅप, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी पतसंस्था, अप्पासाहेब क्षीरसागर पतसंस्था, शहरातील समर्थ सहकारी बँक, गणेश सहकारी बँक, जिल्हा महिला सहकारी बँक, गोदावरी सहकारी बँक आदींची निवडणुक प्रक्रीया सुरू झाली होती.

याशिवाय शिक्षकांची आर्थिक वाहिणी असलेल्या एनडीएसटीचीसाठी तर, १७ जुलै रोजी मतदान होणार होते. त्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्यात होती. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था यांच्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया झाली होती. मात्र, या सर्व संस्थांची निवडणुक प्रक्रीया स्थगित झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या