Thursday, February 12, 2026
Homeनाशिकघरात उतरला विद्युत प्रवाह; सुदैवाने दुर्घटना टळली

घरात उतरला विद्युत प्रवाह; सुदैवाने दुर्घटना टळली

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नवीन नाशकातील संभाजी चौक New Nashik- Sambhaji Chowk येथील एका घरात विदयुत प्रवाह Electric current उतरल्याची घटना घडली. मात्र परिसरातील नागरिकांनी भाजप मंडल अध्यक्ष शिवाजी बर्के यांना फोन करून सदर घटना सांगितली असता त्यांनी तात्काळ महावितरण व मनपा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली सुदैवाने येथे कोणतीही हानी झाली नाही.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि संभाजी चौक येथील रहिवाशी समाधान पाटील यांच्या घरात विद्युत प्रवाह उतरल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी भाजप मंडल अध्यक्ष बर्के यांना सदर घटनेची फोनवरून माहिती दिली.त्यांनी महावितरण व मनपा सेवकांना जागेवर बोलवून सर्व वायरची तपासणी केली तर एक वायर मोकळी असल्याने त्या वायरमधुन पथदिपाच्या Street light पोलला विद्युत प्रवाह उतरला होता.

YouTube video player

गेली दोन दिवस सारखा पाऊस झाल्याने त्या पोलवर तसेच सर्व ठिकाणी पाणी असल्याने हा करंट पाण्यात उतरून पाटील यांच्या संपूर्ण घरातही विद्युत प्रवाह उतरला होता. हे सर्व लक्षात आल्यावर मनपाचे व विजवितरण कंपनीचे वायरमन यांच्या मदतीने त्या वायर कापुन त्या वायरमधील विद्युत प्रवाह बंद करण्यात आल्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सदर विदुयत पोलावरून कुणीतरी अज्ञाताने चोरून विज घेतली होती व काम झाल्यावर सदर वायर कापून उघडीच सोडून दिली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे सदर वायर मधील प्रवाह पोल मध्ये व येथील रहिवासी पाटील यांच्या घरात उतरला. मनपाच्या वायरमनने सदर वायर हटवून त्यातील विद्युत प्रवाह खंडित केला आहे.

मोहन गिते; कनिष्ठ अभियंता मनपा विद्युत विभाग,नवीन नाशिक

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात शिक्षकाकडून चिमुकलींशी असभ्य वर्तन

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरातील एका प्रतिष्ठित प्राथमिक शाळेत एका शिक्षकानेच आठ वर्षीय चार चिमुकलींशी असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन...