Thursday, September 19, 2024
Homeनगरचांदेकसारे परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

चांदेकसारे परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

घारी (वार्ताहर)

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यात चांदेकसारे सह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीज पुरवठा खंडित केला जात आहे. पाच पाच तास वीज गायब होते. मागील रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग देखील हैराण झाला आहे.

ग्रामीण भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे तसेच बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्यात भरीस भर चांदेकसारे, घारी, देर्डे कोर्‍हाळे, डाऊच सह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अचानक वीज गायब पुन्हा पुन्हा येणे जाणे तसेच रात्री-अपरात्री वीज गायब होत असल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

हे हि वाचा : रामगिरी महाराजांवर वैजापूर, नगर, संगमनेरात गुन्हे दाखल

त्यातच ग्रामीण भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील हल्ले वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. बँकांमध्ये कामासाठी आलेल्या लोकांना झेरॉक्स, संगणकावरील कामासाठी तासनतास किंवा दोन दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

15 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पाच-सहा तास वीज पुरवठा खंडित होता. नागरिक वीज उपकेंद्रात फोन करतात. परंतु तेथील फोन बंद करून ठेवलेला असतो, असा अनुभव नागरिकांनी बोलून दाखवला. 16 तारखेला पुन्हा तोच अनुभव आला. वीज पुरवठा बंद आहे तो कधी सुरू होईल यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांकडे नागरिकांनी विचारणा केली असता वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून नागरिकांना योग्य व समर्पक उत्तरे मिळत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

हे हि वाचा : Ladki Bahin Yojana : जिल्ह्यातील बँकांत ‘लाडक्या बहिणीं’ची एकच गर्दी

कर्मचारी फक्त दर महिन्याला वीज बिल देण्यापुरते किंवा थकबाकीची वसुली करण्यापुरतेच नागरिकांची भेट घेतात. जेव्हा नागरिकांना विजेच्या बाबतीतील समस्या असते त्यावेळेस मात्र हे कर्मचारी नागरिकांना भेटतही नाहीत व उपलब्धही होत नाहीत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. चांदेकसारे येथील वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कार्यालय हे गेल्या जवळपास पाच वर्षापासून पोहेगाव येथे स्थलांतरित केलेले आहे.

त्यामुळे या भागातील दोन-तीन गावातील नागरिकांना संबंधित कामासाठी पोहेगाव येथे चकरा माराव्या लागतात. त्यामुळे हे कार्यालय पुन्हा चांदेकसारे येथे सुरू करावे आणि पूर्ण दाबाने, सुरळीत व अखंडपणे वीजपुरवठा करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हे हि वाचा : “आता फक्त ‘कार्यक्रम’ करायचेत”, सुजय विखे असं का म्हणाले?

- Advertisment -

ताज्या बातम्या