Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशElon Musk: "मी आता हे सहन करू शकत नाही..."; एलॉन मस्कचा ट्रम्प...

Elon Musk: “मी आता हे सहन करू शकत नाही…”; एलॉन मस्कचा ट्रम्प यांच्या विधेयकावर संताप

मुंबई | Mumbai
टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन निधी विधेयकावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ते घृणास्पद आणि लज्जास्पद असल्याचे वर्णन केले आहे. तसेच ते म्हणाले, या विधेयकामुळे खुप तोटा होईल.

एलॉन मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी आता हे सहन करू शकत नाही. हे विधेयक प्रचंड, हास्यास्पद आणि अनावश्यक खर्चाने भरलेले आहे. ज्यांनी त्यांच्या बाजूने मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे. मस्क म्हणाले की हे विधेयक अमेरिकेची बजेट तूट $2.5 ट्रिलियन पर्यंत वाढवेल. त्यांनी आरोप केला की काँग्रेस (संसद) देशाला दिवाळखोर बनवत आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये मस्क म्हणाले की पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही जनतेशी विश्वासघात करणाऱ्या सर्व राजकारण्यांना काढून टाकू.

- Advertisement -

अलीकडेच एलॉन मस्क यांनी गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. संघीय खर्च कमी करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, मस्क हे सरकारबरोबरच्या वादातून या विभागातून बाहेर पडले आहेत आणि आता त्यांनी स्वतःला नव्या वादग्रस्त विधेयकापासून दूर ठेवले आहे. सरकार स्थापनेनंतर अवघ्या चारच महिन्यांत एलॉन मस्क सरकारमधून बाहेर पडले आहेत. अर्थसंकल्पावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या अर्थसंकल्पात काही कर सवलती व संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. मात्र, मस्क यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावर त्यांनी टीका केली आहे.

YouTube video player

बिग ब्युटीफुल बिलाचे ५ मुद्द्यांमुळे मस्क संतापले
2017 मध्ये प्राप्तिकर आणि इस्टेट करात कपात कायमस्वरूपी करणे, तसेच कर कपात वाढवण्याचा प्रस्ताव.
ओव्हरटाईम आणि सामाजिक सुरक्षा उत्पन्नावरील कर कपात करण्याचा प्रस्ताव. व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की दरवर्षी 30 ते 80 हजार डॉलर्स कमावणाऱ्यांना पुढील वर्षी 15 टक्के कमी कर भरावा लागेल.
सीमा सुरक्षेवर अधिक खर्च करणे आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिकन सैन्याला बळकटी देणे.
सरकारमध्ये होणारा अनावश्यक खर्च, फसवणूक आणि गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना.
कर्जाची कमाल मर्यादा म्हणजे सरकार किती कर्ज घेऊ शकते याची मर्यादा वाढवणे. ही मर्यादा वेळोवेळी वाढवावी लागेल जेणेकरून सरकार त्याचे बिल आणि खर्च भरू शकेल.

ट्रम्प मत बदलणार नाही-कॅरोलिन लेविट
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांनी केलेल्‍या टीकेला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्‍या म्हणाल्या की अध्यक्ष ट्रम्प यांना या विधेयकाबद्दल मस्क काय विचार करतात हे आधीच माहित होते; परंतु आता मस्क यांच्या भूमिकेमुळे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प मत बदलणार नाही. नवीन कर विधेयक अमेरिकेच्‍या हिताचे असून, राष्‍ट्राध्‍यक्ष त्‍यावर ठाम आहेत. दरम्‍यान, ट्रम्प यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या आर्थिक धोरणाचा कणा म्हणून केले आहे, तर मस्क हे अनियंत्रित खर्चाचे प्रतीक मानतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...