दिल्ली | Delhi
जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अधिग्रहीत केल्यावर एलॉन मस्क चर्चेत आले होते. ट्विटरची धुरा सांभाळताच त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे वापरकर्त्यांना बुचकळ्यात टाकले होते. त्यांच्या सुरवातीला त्यांनी वॉशबेसिन घेऊन ते ट्विटरच्या कार्यालयात आले होते. यानंतरही त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे ते चर्चेत राहिले होते.
दरम्यान, आता एलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता प्रसिद्ध निळ्या चिमणीऐवजी श्वानाचा लोगो (Dog Logo) ट्विटरसाठी वापरण्यात आला आहे. हा बदल पाहून अनेक वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी कनेक्शन, माजी स्वीय सहाय्यकांचा आरोप
सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागले. ट्विटर हॅक झालं की काय असंही अनेकांना वाटलं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केलं आहे.
अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न? Instagram पोस्टमुळे चर्चांना उधाण
एलॉन मस्क म्हणाले की, एलॉन मस्क यांनी “वचन दिल्याप्रमाणे…” असं कॅप्शन देत त्यांच्या जुन्या ट्वीट्सचा स्क्रिनशॉट शेअर केला. तसेच त्यांनी एका नव्या प्लॅटफॉर्मची गरज आहे का? असं विचारलं आहे.