Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशआता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? नेमकं काय म्हणाले एलॉन मस्क? वाचा...

आता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? नेमकं काय म्हणाले एलॉन मस्क? वाचा…

प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी खरेदी केलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरला खरेदी केल्यापासून सातत्याने यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता मस्क यांनी ट्विट पुढील काळात ट्विटर मोफत वापरता येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.’

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहितीनुसार, ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांना ते पायउतार होण्यासाठी सांगू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे.

दरम्यान युजर्सचा ट्विटरवर विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एलॉन मस्क यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. तसेच नवीन फिचर्स देखील आणले जाणार आहे.

कोणत्याही लोकशाहीत काम करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. ट्विटर आणखी चांगल्या नवीन वैशिष्ट्यांसह विकसित करायचे आहे, असंही एलॉन मस्क यांनी सांगितलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या