Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात अघोषित आणीबाणी – देवेंद्र फडणवीस

राज्यात अघोषित आणीबाणी – देवेंद्र फडणवीस

सार्वमत

राज्य सरकारला जाब विचारण्याची राज्यपालांकडे मागणी
मुंबई – राज्यात सध्या अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात काही प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एखादं वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवण्याची आणि राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपा नेते विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढादेखील यावेळी उपस्थित होते.

पत्रात त्यांनी म्हटलं आहे, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे. पत्रात त्यांनी म्हटलं आहे, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या