Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केल्याची बातमी समोर येत आहे. शिंदे यांचे हेलिकॅाप्टरचे राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आली आहे. हेलिकॅाप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही इमर्जन्सी लँडिंग केल्याचं समजतं आहे.

- Advertisement -

सीईओंचा रुद्रावतार पाहून ६ घटस्फोटीतांची बदलीतून माघार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे दौऱ्यावर जात होते. यावेळी ही घटना घडली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱा अचानक रद्द करण्यात आला आहे.

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील राजभवन येथून ते सातारा पाटण येथे दौऱ्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या